Ravindra Jadeja T20 World Cup  esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : आशिया कपनंतर गुडघा दुखापतीमुळे जडेजा T-20 World Cup मधूनही बाहेर!

भारताचा हुकमी फिरकी अष्टपैलू आणि चपळ क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत जवळपास बाहेर...

Kiran Mahanavar

Ravindra Jadeja T20 World Cup 2022 : भारताचा हुकमी फिरकी अष्टपैलू आणि चपळ क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत जवळपास मुकणार आहे. त्याला गुडघ्याची दुखापत गंभीर असून अनिश्चित काळासाठी तो मैदानापासून दूर राहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत जडेजा पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळला. पाकविरुद्ध तर त्याची फलंदाजी मौल्यवान ठरली होती.

जडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत फार गंभीर आहे. त्याला मोठ्या शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहील. एका राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील जडेजाच्या गुडघ्याचे निदान केल्यानंतर स्पष्ट केल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाराने दिली. ही दुखापत निश्चित कोणत्या स्वरूपाची आहे हे स्पष्ट झाले नाही; परंतु अँटिरिर क्रुसिएट लिगामेंट या स्वरूपाची ही दुखापत असेल तर सहा महिने तरी तो खेळू शकणार नाही, असेही सांगण्यात आले. पण सध्या तरी तो तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल.

जडेजाला गुडघा दुखापतीचा त्रास अधूनमधून होत असतो, तो तिन्ही प्रकारांबरोबर आयपीएलमध्ये खेळत असल्याचा ताण त्याच्या गुडघ्यावर आला असेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. गोलंदाजी करताना उजव्या पायाच्या त्याच्या गुडघ्यावर अधिक ताण पडत असतो.

जडेजा आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही प्रकारांतील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय (प्रथम श्रेणी, अ श्रेणी आयपीएलसह) सामन्यांची संख्या जवळपास ६३० पर्यंत जात आहे आणि त्यात त्याने ७ हजारांहून अधिक षटके टाकली आहेत. यात नेटमधील सरावाच्या चेंडूंचा समावेश नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

SCROLL FOR NEXT