Ravindra Jadeja wife Rivaba Jadeja esakal
क्रीडा

Ravindra Jadeja Father Interview : वडिलांची मुलाखत पूर्णपणे चुकीची... जडेजाच्या घरातील वाद आला चव्हाट्यावर

Ravindra Jadeja Father Interview : वडिलांची मुलाखत सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Father Interview Controversy : भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जडेजा सध्या दुखापतग्रस्त असून तो दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत उपचार घेतोय. तो इंग्लंविरूद्धची तिसरी कसोटी खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. तत्पूर्वी जडेजा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. जडेजाच्या वडिलांची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. त्यावर जडेजाने खुलासा केला आहे.

रविंद्र जडेजाने गुजरातीमध्ये ट्विट करत वडिलांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली. तो ट्विटमध्ये म्हणतो की, 'मुलाखतीत जे काही सांगितलं जात आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. याला कोणताही अर्थ नाहीये. मी अशा प्रकारच्या गोष्टी मानत नाही. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे निंदनीय असून मला देखील खूप काही सांगायचं आहे. मात्र योग्य वेळी मी बोलणार आहे.'

माध्यमांनी कोणती बातमी दिली?

रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्ध जडेजा यांनी एका स्थानिक वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत वडिलांनी 'माझा आता माझ्या मुलाशी कोणताही संबंध नाही. जेव्हापासून त्याचं लग्न झालं आहे तो पूर्णपणे बदलला आहे. मी त्याला क्रिकेटर केलं नसतं तर बरं झालं असतं, माझा मुलगा माझ्याजवळ तरी असता.'

मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्ध सिंह जडेजा आणि रिवाबा यांच्यात फारसं सख्य नाही. वडिलांनी सांगितले की रविंद्र आणि सून रिवाबासोबत त्यांचे बोलणे होत नाही. ते आम्हाला बोलवत नाहीत आणि आम्ही त्यांना बोलवत नाही. आमच्यात कोणतंही नातं नाही. पाच वर्षे झाली अनिरूद्ध सिंह यांनी आपल्या नातवाचं तोंड पाहिलेलं नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT