Ravindra Jadeja sakal
क्रीडा

IND vs WI: रवींद्र जडेजाने गुजराती बापूचे करिअर केले उद्ध्वस्त!

IND vs WI: जडेजा ठरला 'या' खेळाडूच्या करियर उद्ध्वस्त व्हायचे कारण!

Kiran Mahanavar

IND vs WI 4th ​​T20 Ravindra Jadeja: वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत असलेल्या टी-20 मालिकेत अष्टपैलू रवींद्र जडेजा खेळत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतरच जडेजाने या मालिकेत पुनरागमन केले आहे. जडेजाच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाच्या एका खेळाडूचे मोठे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळात हा खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे, मात्र जडेजाच्या आगमनानंतर या खेळाडूला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागले आहे. या खेळाडूला मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. रवींद्र जडेजा मालिका सुरू होण्यापूर्वीच जखमी झाला. जडेजाच्या जागी मालिकेत अष्टपैलू अक्षर पटेलला (बापू) प्लेइंग 11 मध्ये संधी देण्यात आले. अक्षर पटेलची या मालिकेत कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्याने संघाचे सामनेही जिंकले, पण टी-२० मालिकेत रवींद्र जडेजा परतताच अक्षर पटेलला बेंचवर बसावे लागले. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत, अक्षर पटेलने एकदिवसीय मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. मालिकेत त्याने 3 सामन्यांत 2 डावात 85.00 च्या सरासरीने 85 धावा केल्या आणि 5.50 च्या इकॉनॉमीने 2 बळी घेतले. अक्षर पटेलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 35 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या आणि 1 बळीही घेतला.

अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा नेहमीच टीम इंडियाची पहिली पसंती राहिला आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा संघाच्या प्लेइंग 11 चा भाग होता. त्याने या दोन सामन्यांमध्ये 21.50 च्या सरासरीने 43 धावा केल्या आणि 6.00 च्या इकॉनॉमीने धावा खर्च करताना 2 बळीही घेतले. एकदिवसीय मालिकेपूर्वी जडेजाला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT