Team India sakal
क्रीडा

Team India : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची संपत्ती 100 कोटींहून अधिक

'या' खेळाडूला राजेशाही जीवन जगण्यासाठी ओळखला जातो

Kiran Mahanavar

Indian Cricketer Ravindra Jadeja Lifestyle : टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या लग्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. टीम इंडियाचा रवींद्र जडेजा जगातील स्टार अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. त्यामुळे त्यांची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त आहे. रवींद्र जडेजा गेल्या काही वर्षांत टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. रवींद्र जडेजा राजेशाही जीवन जगण्यासाठी ओळखला जातो.

अष्टपैलू रवींद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 रोजी जामनगरमध्ये झाला. जडेजाचे वडील जामनगरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. आजच्या काळातील रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स ओलांडली आहे. जडेजाच्या उत्पन्नाचा आणि निव्वळ संपत्तीचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करतो. आयपीएल 2022 मध्ये त्याला चेन्नई संघाने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.

रवींद्र जडेजाचा बंगला राजवाड्यापेक्षा कमी नाही. 4 मजली बंगल्यात मोठे दरवाजे आणि विंटेज फर्निचर आणि झुंबर आहेत. रवींद्र जडेजा अनेकदा आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. रवींद्र जडेजाचेही 'मी जड्डू' फार्म हाऊस आहे. जडेजाच्या आईची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावे. मात्र, जडेजाच्या आईला आपल्या मुलाला भारतीय संघाच्या जर्सीत पाहता आले नाही. 2005 मध्ये त्यांची आई लता यांचे अपघाती निधन झाले आणि आईच्या मृत्यूनंतर त्यांनी क्रिकेट जवळजवळ सोडले. पण त्याची मोठी बहीण नयनाने त्याला साथ दिली आणि कुटुंबाचीही काळजी घेतली. त्यानंतर जडेजाने पुन्हा क्रिकेटला सुरुवात केली.

रवींद्र जडेजाची आतापर्यंतची 171 एकदिवसीय सामन्यांमध्ये जडेजाने 13 अर्धशतकांसह 2447 धावा केल्या आणि त्याच्या नावावर 189 विकेटही आहेत. 60 कसोटीत 2523 धावा करत 242 विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाने टी-20 मध्ये 62 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये जडेजाने 422 धावा केल्या असून 50 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT