richard gleeson debut international match sakal
क्रीडा

वयाच्या 34व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण; ८ चेंडूत भारताचे 'हे' तीन दिग्गज केले आऊट

इंग्लंड संघासाठी वयाच्या 34 व्या वर्षी रिचर्ड ग्लीसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

Kiran Mahanavar

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहे. इंग्लंड संघासाठी वयाच्या 34 व्या वर्षी रिचर्ड ग्लीसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. (richard gleeson debut international match)

वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने आपल्या पहिल्याच टी-20 सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने पहिल्या 8 चेंडूंवर भारताच्या 3 दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतसोबत सलामीची जबाबदारी घेतली. दोघांनी 49 धावांची भागीदारी केली. ग्लेसनने रोहित शर्माला त्याच्या पहिल्या षटकाच्या ५व्या चेंडूवर बटलरकरवी झेलबाद केले. रोहितने 20 चेंडूत 31 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले.(richard gleeson debut international match took wickets rohit sharma virat kohli rishabh pant ind vs eng 2nd t20i)

ग्लीसनने दुसऱ्या षटकात आश्चर्यकारक कामगिरी करत लागोपाठ विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने विराटला पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मलानकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पंतला बटलरने विकेटच्या मागे झेलबाद केले. त्यामुळे भारताची धावसंख्या 3 बाद 61 अशी झाली. अशाप्रकारे ग्लीसनने आपल्या पहिल्याच सामन्यात पहिल्या 8 चेंडूत 3 बळी घेतले. ग्लेसनने आत्तापर्यंत 34 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 3.31 च्या इकॉनॉमी रेटने 143 बळी घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT