Rinku Singh esakal
क्रीडा

Rinku Singh : 100 मीटर लांब षटकार कसा मारला... रिंकूनं सांगितलं 'पॉवर हिटिंग'चं रहस्य

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh : भारताचा नवा मॅच फिनिशर रिंकू सिंहसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी 20 मालिका ही स्वप्नवत राहिली आहे. त्याने प्रत्येक सामन्यात चांगल्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. चौथ्या सामन्यात रिंकूने 29 चेंडूत 46 धावा केल्या. त्याला मालिकेतील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 9 बाद 174 धावा केल्या. त्यानंतर कांगारूंना 154 धावात रोखत सामना 20 धावांनी जिंकला याचबरोबर भारताने मालिका खिशात टाकली. रिंकूने या सामन्यात ऋतुराज गायकवाडसोबत डाव सावरला होता.

यावेळी रिंकू नवव्या षटकात फलंदाजीला आला होता. त्यानंतर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यावर त्याने डावाला आकार दिला. या खेळीदरम्यान रिंकूने 100 मीटर लांब षटकार मारला होता. हा या मालिकेतील सर्वात लांब मारलेला षटकार ठरला.

दरम्यान, सामना झाल्यानंतर रिंकूलाला जितेश शर्माने काही प्रश्न विचारले, त्यावेळी बोलताना रिंकू म्हणाला की, 'मी खूप काळापासून खेळत आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी आयपीएल खेळतोय. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी स्वतःवर विश्वास ठेवतो आणि शांत राहण्याचा प्रयत्न करतो.'

जितेश शर्मा बोलताना म्हणाला की, मी ज्यावेळी फलंदाजीला आलो त्यावेळी दबावात होतो. तो रिंकूला म्हणाला की, 'तू पहिलीच मालिका खेळतोस असं वाटलं नाही. मी ज्यावेळी फलंदाजीला आलो त्यावेळी दबावात होतो. मात्र तू खूप शांत होतास आणि सहजतेने शॉट मारत होतास.'

इशान किशनच्या ऐवजी संधी मिळालेल्या जितेश शर्माने सांगितले की रिंकूने त्याला शांत राहण्यास मदत केली. यासाठी त्याने रिंकूचे आभार देखील मानले. जितेश म्हणाला की, 'तू मला कायम सांगत होतास की शांत रहा आणि कोणताही दबाव घेऊ नको.'

रिंकू आपल्या 100 मीटर लांब षटकार मारण्याबाबत देखील वक्तव्य केलं. त्याला एवढ्या लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारण्यात आलं. त्यावेळी तो म्हणाला की, मला वजन उचलायला आवडतं त्यातून मला ताकद मिळते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT