rishabh pant and dinesh karthik
rishabh pant and dinesh karthik sakal
क्रीडा

Pant-Karthik : दिनेश कार्तिकने 7 मध्ये केल्या 17 पंतच्या करिअरला निर्माण झालाय खतरा!

Kiran Mahanavar

Rishabh Pant and Dinesh Karthik : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 16 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावाच करू शकला आणि टीम इंडियाने सामन्यासह मालिकाही जिंकली. भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिनेश कार्तिकने या सामन्यात सात चेंडूत 17 धावा करत ऋषभ पंतच्या करिअरला खतरा निर्माण केला आहे.

दोन आठवड्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची होती. यासोबतच रोहित शर्माने आतापासून टी-20 विश्वचषकासाठी आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन आठवड्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी अधिक वेळ दिला आहे. ऋषभ पंतमध्ये टॅलेंट आहे यात शंका नाही. पण सत्य हे आहे की टी-20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.

भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. आशिया चषकात पंतची निवड झाली होती, तर कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये मैदानात उतरवण्यात आले होते. या मालिकेत दिनेश कार्तिकला फलंदाजीची फार कमी संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये दिनेश कार्तिकला दोन सामने खेळण्याची संधी दिली. दूसऱ्या सामन्यात दिनेश कार्तिकने 7 चेंडूत 17 धावा करत ऋषभ पंत अडचणीत आणले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पुर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Today: जागतिक बाजारात जोरदार तेजी; आज कसा असेल शेअर बाजार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Amit Shah on Kejriwal's bails: 'केजरीवाल यांना विशेष वागणूक मिळाली...', जामिनावर अमित शाहांचा हल्लाबोल

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Latest Marathi News Live Update : "पुण्यातील बेकायदा होर्डिग्ज 7 दिवसांच्या आत हटवा" महापालिका आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT