IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांचा आक्रमक फॉर्म पाहायला मिळत आहे. विशेष करून रिषभ पंतने या ऐतिहासिक मैदानावर एक ऐतिहासिक कामगिरीची आपल्या नावावर नोंद करून घेतली आहे.
रिषभ पंतने महान क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांचा एक विक्रम मोडीत काढला आहे. ज्यामुळे रिषभचे आता कौतुक होत आहे. षटकार मारण्यात माहीर असणाऱ्या रिषभने आता इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात आतापर्यंत ३५ षटकार मारले आहेत, ज्यामुळे वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांना त्याने या षटकारांच्याबाबतीत मागे टाकले आहे. रिचर्ड्स यांनी इंग्लंडविरुद्ध ३४ षटकार मारले होते.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप ५ खेळाडू पाहायचे झाले तर, यामध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत. ज्यात अव्वल स्थानावर रिषभ पंत – ३५ षटकार, विव रिचर्डस – ३४ षटकार, टिम साउदी – ३० षटकरा, यशस्वी जयस्वाल – २७ षटकार, शुभमन गिल – २६ षटकार
तसेच रिषभने कसोटीत ८८ षटकार पूर्ण करताना रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि आता त्या वीरेंद्र सेहवाग ( ९०) याचा विक्रम खुणावतोय. रिषभ व राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुल व पंत यांनी कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये ओव्हल व २०२५ मध्ये लीड्सवर असा पराक्रम केला होता. या सामन्यात रिषभने खणखणीत षटकार खेचून ८६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.