Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: ऋषभ पंतवर होणार गुन्हा दाखल? DGPनी दिली अपडेट

Kiran Mahanavar

Rishabh Pant Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत एका मोठ्या अपघातुन थोडक्यात बचावला. पंत स्वतः दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी एकटेच कार चालवत जात होता. दरम्यान गुरुकुल नरसन परिसराजवळ त्यांची कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. अशा परिस्थितीत ऋषभ पंतबद्दल चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. पंतच्या प्रकृतीबाबतही चाहते चिंतेत आहेत. यासोबतच त्यांना हेही जाणून घ्यायचे आहे की, ऋषभ पंतवर ओव्हर स्पीडिंगचा गुन्हा दाखल होणार की नाही? ऋषभ पंतला उपचारासाठी विमानाने दिल्लीला नेणार? अपघातस्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने काय अपडेट दिले?

दरम्यान या सर्व प्रश्नांची उत्तरं डीजीपी अशोक कुमार यांनी दिली. त्यांनी सांगितले, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असुन कुठलीही गंभीर बाब नाही. तसेच त्याची प्रकृती बरी असल्याने त्याला एअरलिफ्ट करण्याचीही आवश्यकता आहे असं वाटत नाही. आता अपघातातून बचावलेल्या पंतवर ओव्हरस्पिडिंगची केस होणार का? असं विचारलं असता डीजीपीनी सांगितले की, माझ्या अधिकाऱ्यांनी असं काही घडलं नसल्याचं सांगितलं. केवळ पंतला झोप आल्याने घडलेला हा अपघात होता.

अपघात झाला तेव्हा ऋषभ पंत एकटाच कार चालवत होता. ऋषभ पंतने अपघातानंतर सांगितले की, ड्रायव्हिंग करताना मला झोप लागली होती, आणि कार डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर मी विंड स्क्रिन तोडून बाहेर आलो. त्यानंतर कारला भीषण आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

"लग्न करणं हे माझं स्वप्न होतं.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली..

Latest Marathi News Live Update : पुण्यात नदीत पोहताना १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

March 2026 Holidays: मार्च 2026 मध्ये शाळा–कॉलेज कोणत्या दिवशी बंद राहणार? जाणून घ्या होळी, गुढीपाडवा, ईदसह संपूर्ण सुट्ट्यांची यादी

MSRTC: अफवांना बळी पडू नका; सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी कोणतीही नवीन सक्ती नाही, एसटी महामंडळाचा खुलासा

SCROLL FOR NEXT