Rishabh Pant Fitness esakal
क्रीडा

Rishabh Pant Fitness : ऋषभ पंतच्या पुनरागमनाचा दौरा ठरला! फलंदाजी, यष्टीरक्षण सराव झाला सुरू

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Fitness : बीसीसीआयने नुकतेच त्याच्या वैद्यकीय टीमद्वारे दुखापतग्रस्त खेळाडू कधीपर्यंत फिट होतील याचा एक अंदाज बांधला आहे. भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत उत्साहवर्धक गोष्ट समोर आली आहे. भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंत हा कधीपर्यंत भारतीय संघात पुनरागमन करू शकतो याचा अंदाज बीसीसीआयने वर्तवला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कार अपघातानंतर गुडघ्यावर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागलेला ऋषभ पंत सध्या एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे. त्याच्या फिटनेसमध्ये सध्या प्रचंड वेगाने सुधारणा होत आहे. चाहत्यांनी ऋषभ पंत जीममध्ये व्यायाम करतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. तो आता कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतो. (Rishabh Pant Team India Come Back News)

बीसीसीआयने देखील ऋषभ पंतने नेटमध्ये फलंदाजीचा हलका सराव देखील करण्यास सुरूवात केल्याचे सांगितले. ऋषभ पंतसोबतच भारताचे श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, केएल राहुल यासारखे दुखापतग्रस्त खेळाडू हे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत रिहॅबिलिटनेशन करत आहेत.

बीसीसीआयने पंतच्या प्रगतीबाबत माहिती देताना म्हणते की, 'ऋषभ पंतने रिहॅबिलिटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. तो आता नेटमध्ये बॅटिंग आणि किपिंगचा हलका हलका सराव देखील करत आहे. पंत सध्या त्याच्यासाठी तयार करण्यात आलेल्या फिटनेस प्रोग्राम नुसार स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलिटी आणि रनिंग याचे व्यायाम करत आहे.'

बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत हा पुढील वर्षी भारतात होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघात परतलेला दिले. बीसीसीआयच्या सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 'ऋषभ पंतसाठी पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरूद्ध भारतात होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांची मालिका हे तंदूरूस्त होण्याचे टार्गेट आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT