Rishabh Pant made the vice captain for T20I series Kuldeep Yadav included in team
Rishabh Pant made the vice captain for T20I series Kuldeep Yadav included in team  esakal
क्रीडा

Valentine Day ला पंत भाऊंच प्रमोशन तर कुलदीपला अखेर मिळाला होकार!

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल लिलावाचा करोडोंचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेचे (India vs West Indies T 20 Series) वेध लागले आहे. लिलावात आकर्षण ठरलेले विंडीज खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, विंडीजला वनडे मालिकेत व्हाईट वॉश देणाऱ्या भारतीय संघाला दोन धक्के बसले. त्यामुळे आयत्या वेळी संघात काही बदल करावे लागले आहेत. दुखापतग्रस्त उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) टी 20 मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतचे (Rishabh Pant) प्रमोशन झाले असून आता या मालिकेत पंत उपकर्णधार असणार आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav)देखील वनडे पाठोपाठ टी 20 मालिकेचीही लॉटरी लागली आहे. तिसऱ्या वनडेनंतर निवडसमितीत जुळून येती रेशीम गाठीचा सीन क्रिएट झालायं.

भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातला उपकर्णधार केएल राहुल वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला बहिणीच्या लग्नामुळे मुकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात तो भारतीय संघात (Indian Cricket Team) परतला होता. याच सामन्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे परत तो तिसऱ्या सामन्यात खेळला नाही. त्याची दुखापत अजून बरी झाली नसल्याने तो टी 20 मालिका खेळू शकणार नाही.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर बीसीसीआयने Valentine Day म्हणजेच 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घोषणा केली की केएल राहुलच्या अनुपस्थिती संघाचे उपकर्णधारपद ऋषभ पंत सांभाळेल. याचवेळी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या टी 20 संघात अजून एक बदल केला. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवची वर्णी लावली. त्यामुळे पंत आणि यादवसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे गुडी गुडी गेला. कुलदीप यादवने वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रभावी मारा केला होता. त्यामुळे निवडसमितीने त्याला टी 20 संघाचे तिकीट काढून देत त्याच्यावरचे आपले प्रेम व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT