Rishabh Pant Bangladesh Vs India 1st Test  esakal
क्रीडा

Rishabh Pant : पांढऱ्या कपड्यात पंत आला रंगात; अर्धशतक हुकले मात्र इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Bangladesh Vs India 1st Test : बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेली. यानंतर ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये चाचपडणाऱ्या पंतने पांढऱ्या कपड्यातील कसोटी क्रिकेटमध्ये आश्वासक फलंदाजी केली. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला मेहदी हसन मिराजने चकवा दिला. मात्र पंतने बाद होण्यापूर्वी मोठा विक्रम केला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली. शुभमन गिल आणि केएल राहुल या सलामी जोडीने 41 धावांची भागीदारी रचली खरी मात्र दोघेही सेट झाले आहेत असे वाटत असतानाच तैजुल इस्लामने शुभमन गिलला 20 धावांवर बाद केले. पाठोपाठ केएल राहुल देखील खालेद अहमदच्या गोलंदाजीवर 22 धावा करून बोल्ड झाला. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. मात्र तैजुल इस्लामने विराट कोहलीला उत्कृष्ट फिरकीवर अवघ्या 1 धावेवर पायचीत बाद केले.

भारताची अवस्था 3 बाद 48 धावा अशी झाली असताना ऋषभ पंतला बढती देऊन मैदानावर पाठवण्यात आले. त्या आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत भारताचा धावलफल हलता ठेवला. दुसऱ्या बाजूने पुजाराने एक बाजू लावून धरली होती. या दोघांनी उपहारापर्यंत भारताला शतकी मजल मारून दिली. उपहारापूर्वी 30 धावांवर खेळणाऱ्या पंतने उपहारानंतर आक्रमक फटकेबाजी करत 45 चेंडूत 46 धावांपर्यंत मजल मारली.

मात्र मेहदी हसन मिराजच्या टॉप स्पिनवर पंत गडबडला. यात नादात तो 46 धावांवर बोल्ड झाला. चांगल्या लयीत दिसणाऱ्या पंतला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 46 धावांवर बाद झाला. मात्र या छोट्या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. पंतने कसोटीतील आपले षटकारांचे अर्धशतक मात्र पूर्ण केले. याचबरोबर कसोटीत भारताकडून सर्वात वेगवान 50 षटकार मारणारा फलंदाज देखील ठरला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT