Rishabh Pant  sakal
क्रीडा

Rishabh Pant : रोहितने पंतला संघातून टाकले काढून! BCCIने सामन्यापूर्वी दिला मोठा अपडेट

केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे.

Kiran Mahanavar

Rishabh Pant IND vs BAN : भारतीय संघ आज ढाका येथे बांगलादेश विरुद्ध वनडे मालिकेला सुरुवात करत आहे. नाणेफेक बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने जिंकला असून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारताकडून कुलदीप सेनला पदार्पणाची संधी मिळाली आहे. ऋषभ पंत बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. अशा परिस्थितीत पंतला संघातूनच वगळण्यात आली आहे. केएल राहुल विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे.

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. या मालिकेसाठी त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. ढाका येथे मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले. वैद्यकीय पथकाशी बोलणे झाल्यानंतर पंतला विश्रांती देण्यात आल्याचे समजते आहे. 25 वर्षीय पंत हा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेचा भाग होता. मात्र, त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

बीसीसीआयने ट्विट करत लिहिले की, 'वैद्यकीय संघाच्या सल्ल्यानंतर ऋषभ पंतला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल. त्याच्या जागी एकाही खेळाडूचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. अक्षर पटेल पहिल्या वनडेसाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल या सामन्यात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

Latest Marathi News Live Update : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळ

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

Mango Alphonso : सगळ्या जगाला माहितीय हापूस कोकणाचा आहे, पण गुजरात म्हणतं हापूस आमचा..., आंबा बागायतदार लढा देणार

SCROLL FOR NEXT