Rishabh Pant Health Update
Rishabh Pant Health Update sakal
क्रीडा

Rishabh Pant: "माणुसकी नाही का..." पंतला अ‍ॅम्बुलन्समधून नेताना बहिणीचा संयम सुटला; व्हिडीओ व्हायरल

Kiran Mahanavar

Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला आहेत. मात्र अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डिव्हायडरला धडकल्यानंतर कारने पेट घेतला. पण सुदैवाने त्यावेळी तो कारमधून बाहेर पडला होता.

त्यानंतर ऋषभ पंत चांगल्या उपचारासाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची बातमी आली. डॉक्टरांनी सांगितले की डोळ्याच्या वर 2 कट आहेत. पाठीची त्वचा खराब झाली आहे आणि पायाचा लिगामेंट फाटला आहे. जेव्हा त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून चांगल्या उपचारांसाठी मुंबईला हलवले जात होते. त्यावेळी मीडियावाल्यांची गर्दी पाहून ऋषभच्या बहिणीचा संयम सुटला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऋषभ पंतच्या चांगल्या उपचारांसाठी त्याला डेहराडूनहून मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे तो बीसीसीआयच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणार आहे. पंतला हॉस्पिटल मधुन बाहेर आणताच मीडिया कर्मचार्‍यांनी त्यांची झलक पाहण्यासाठी डेहराडूनमधील हॉस्पिटलचा परिसर घेरला होता.

त्याचवेळी पंत यांची बहीण साक्षी पंत यांनी रुग्णवाहिकेच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांवर आरडाओरडा केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपला संयम गमावून तो म्हणाला, माणुसकी आहे का नाही तुमच्यात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

MI vs LSG Live Score IPL 2024 : केएलच्या संथ फलंदाजीवर निकोलसचा आक्रमक उतारा; मुंबईसमोर ठेवलं 215 धावांचे आव्हान

Uddhav Thackeray: "4 जूननंतर देश डि'मोदी'नेशन करणार, शिवाजी पार्कवर शेवटचं..."; ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

Latest Marathi News Live Update: मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड?

SCROLL FOR NEXT