Rishabh Pant special post for Rajat Kumar Nishu Kumar who helped hin during car accident  
क्रीडा

Rishabh Pant Post : जीव वाचवणाऱ्या 'त्या' दोघा हिरोंसाठी ऋषभ पंतची खास पोस्ट, म्हणाला…

सकाळ डिजिटल टीम

कार अपघातात जखमी झालेला भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने अपघातानंतर सोशल मीडियावर आपली पहिली पोस्ट टाकली आहे. गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आपल्या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

या पोस्टमध्ये त्याने त्याच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, मैदानातील परतीचा प्रवास सुरू झाला असून, पुढील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे पंतने ट्वीटमध्ये म्हटले आहे. अपघातानंतर मदत केल्याबद्दल पंतने बीसीसीआय आणि जय शहा यांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत.

तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक

बीसीसीआय आणि जय शाहांसोबतच पंतने सर्व चाहते, डॉक्टर आणि फिजिओ यांचेदेखील मनापासून आभार मानले आहेत. तसेच तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

रजत आणि निशूचेही मानले आभार

या यष्टीरक्षक फलंदाजाने एकापाठोपाठ तीन पोस्ट केल्या आहेत. त्याच्या शेवटच्या पोस्टमध्ये त्यांने रजत आणि निशू नावाच्या तरुणांची आठवण काढली आहे. या तरुणांनी त्याची अपघातानंतर मदत केली होती.

पंतने लिहिले- 'मी वैयक्तिकरित्या सर्वांचे आभार मानू शकत नाही, परंतु मला या दोन हिरोजचे आभार मानायचे आहेत. ज्याने अपघातानंतर मला मदत केली आणि मला सुखरूप रुग्णालयात नेले. रजत कुमार आणि निशू कुमार, धन्यवाद. मी तुमचा सदैव ऋणी आणि ऋणी राहीन'

30 डिसेंबर रोजी घरी परतत असताना पंतच्या कारला रुरकीजवळ दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला होता. या धडकेनंतर पंतच्या कारने पेट घेतला होता. वेळीच सावध होत पंत गाडीतून बाहेर पडला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर पंतच्या गुढग्यावर लिगामेंटची यशस्वी सर्जरी जानेवारीच्या सुरूवातीला करण्यात आली आहे. . सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT