Road Safety World Series 2022 Sachin Tendulkar's India Legends clinch title for 2nd consecutive time cricket  
क्रीडा

टीम इंडिया दुसऱ्यांदा बनली legends league चॅम्पियन; सचिन तेंडूलकरने रचला इतिहास

कर्णधार सचिन तेंडुलकर या सामन्यात काही खास करू शकला नाही, पण त्याने डगआउटमधून मास्टर स्ट्रोक खेळत....

Kiran Mahanavar

Road Safety World Series 2022 : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सने शनिवारी रात्री रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये दिलकरत्ने दिलशानच्या श्रीलंका लिजेंड्सचा 33 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. कर्णधार सचिन तेंडुलकर या सामन्यात काही खास करू शकला नाही, पण त्याने डगआउटमधून मास्टर स्ट्रोक खेळत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

इंडिया लिजेंड्सने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. मोठ्या फलंदाजांच्या अपयशानंतरही भारताच्या दिग्गजांना या धावसंख्येपर्यंत नेण्यात यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझाने मोठी भूमिका बजावली. त्याने 71 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या. 152.11 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत नमनने 15 चौकार आणि 2 षटकार मारले. या सामन्यात सचिन तेंडुलकरला खाते उघडणेही कठीण झाले. त्याच्याशिवाय सुरेश रैनालाही 10 धावांच्या पुढे जाता आले नाही. युवराज सिंगनेही केवळ 19 धावा केल्या. मात्र, नमन ओझाच्या शतकी खेळीमुळे या दिग्गजांच्या अपयशाने इंडिया लिजेंड्सची साथ सोडली नाही.

मात्र, 196 धावांच्या लक्ष्यासमोर श्रीलंका लिजेंड्स संघ 18.5 षटकात 162 धावा करून सर्वबाद झाला. अशा प्रकारे इंडिया लिजेंड्सने हा सामना 33 धावांनी जिंकला. भारताकडून विनय कुमार हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शतक झळकावणाऱ्या नमन ओझाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला या स्पर्धेत 5 विकेट्सशिवाय 192 धावा केल्याबद्दल मालिका सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT