T20 World Cup Semi Finalist Robin Uthappa Prediction esakal
क्रीडा

Robin Uthappa : उथप्पा काय म्हणतोय; भारत नाही तर पाकिस्तान सेमी फायनल खेळणार!

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup Semi Finalist Robin Uthappa Prediction : भारत ऑस्ट्रेलियातीली टी 20 वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत खेळणार आहे. दरम्यान, सुपर 12 फेरी सुरू झाल्यानंतर यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये कोणते संघ सेमी फायनल गाठतील याबाबत माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट पंडित अंदाज वर्तवत आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने वर्तवलेल्या अंदाजामुळे तो चर्चेत आला आहे.

रॉबिन उथप्पाने इएसपीएल क्रिकइन्फोशी बोलतना सांगितले की, 'मी माझे सेमी फायनलिस्ट सांगण्याआधीत स्पष्ट करतो की माझा अंदाज ऐकून भारतीय चाहत्यांना आनंद होणार नाहीये. तरी माझे सेमी फायनलिस्ट हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका असतील.'

दुसरीकडे अनिल कुंबळे, टॉम मूडी, फाफ ड्युप्लेसिस, सॅम बिलिंग्स आणि डॅरेन गंगा यांनी आपल्या सेमी फायनलिस्टमध्ये भारताचा देखील समावेश केला आहे. भारतीय संघ आपली वर्ल्डकप मोहिम 23 ऑक्टोबरला मेलबर्नवर पाकिस्तानशी खेळून सुरू करणार आहे.

वर्ल्डकपला सामोरे जाण्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव करत दमदार सुरूवात केली होती. न्यूझीलंड विरूद्धचा सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी दोन आठवडे आधीत दाखल झाला होता. त्यावेळी संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाशी दोन सराव सामने देखील खेळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT