Yuvraj Singh hitting six sixes Player prevented Dinesh Karthik to go to the bathroom
Yuvraj Singh hitting six sixes Player prevented Dinesh Karthik to go to the bathroom esakal
क्रीडा

T20 WC Flash Back : युवराजच्या 6 सिक्समुळं DK ला टॉयलेटलाही जाता आलं नाही

अनिरुद्ध संकपाळ

Yuvraj Singh Hitting Six Sixes : भारताने पहिल्या वहिल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इतिहास रचला होता. कोणाच्या ध्यानी मनी नसताना बघता बघता वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगने तर कमालच केली होती. त्याने जबरदस्त फलंदाजी करत भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. या वर्ल्डकपमध्ये त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारण्याची किमया देखील केली. याच आठवणींना टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रॉबिन उथप्पाने उजाळा दिला. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) युवराज ज्यावेळी ब्रॉडला चोपत होता त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते हे सांगितले.

रॉबिन उथप्पा व्हिडिओत म्हणतो की, 'मी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गेलो. माझे पॅड काढले आणि खाली डग आऊटमध्ये आलो. मी खाली येईपर्यंत युवराजने आपले रंग दाखवायला सुरूवात केली होती. त्याच्या बॉडी लँग्वेजमधून तो आता चार्ज झाला आहे हे जाणवत होते.'

उथप्पा पुढे म्हणाला की, 'युवराजने पहिला षटकार मारल्यानंतर वाटलं की पाजी रागात आहेत. त्याने दुसरा षटकार मारल्यानंतर आम्हला आता काही वेगळं होणार आहे याची कल्पना यायला लागली. तिसऱ्या षटकारानंतर आम्ही सर्वजण म्हणालो की जिथे आहात तिथेच थांबा. मला वाटतं दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) का अजून कोणाला टॉयलेटमध्ये जायचं होतं. आम्ही म्हणालो की कोणी जागचं हलणार नाही. हे षटक संपेपर्यंत तरी कोणी हलायचं नाही.'

'मला आठवतयं की युवराजने पाचवा षटकार मारला त्यावेळी सर्व खूष झाले होते. आम्हाला माहितं होतं की सहावा षटकार येणार आहे. आम्हाला बाहेर बसून हे माहिती होतं आणि अगदी तसंच झालं. आम्ही सहावा षटकार सेलिब्रेट केला.'

भारताने 2007 मध्ये पहिल्यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकला. मात्र त्यानंतर भारताला टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडिया पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकेल अशी आशा चाहते करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT