roelof van der merwe brilliant catch that put south africa out of t20 world cup sakal
क्रीडा

T20 WC : जुना खेळाडू बनला दक्षिण आफ्रिकेचा दुश्मन! विश्व कप मधून काढले बाहेर

आफ्रिकन खेळाडूने दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी...

Kiran Mahanavar

t20 world cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 मधील ग्रुप स्टेजचा रविवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी गट-2चे तीन सामने खेळल्या गेले. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात झाला. या सामन्यात स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट पाहिला मिळाला. नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला आणि टी-20 विश्वचषकातून बाद काढले. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने चार विकेट गमावत 158 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ आठ विकेट गमावून केवळ 145 धावा करू शकला.

दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 16व्या षटकात डेव्हिड मिलर बाद झाला आणि इथून सामना फिरला. नेदरलँड्सच्या व्हॅन डर मर्वेने अप्रतिम झेल घेत मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मर्वेच्या या झेलने 1983 च्या विश्वचषकातील कपिल देवच्या झेलची आठवण करून दिली. कपिल देवने वेस्ट इंडिजविरुद्ध धाव घेत शानदार झेल घेतला. त्याच पद्धतीने मर्वेनेही मागे धावत सर्वोत्तम झेल टिपला आणि मिलरला बाद केले.

धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 15 षटकांत 4 गडी गमावून 111 धावा केल्या. क्लासेन 16 आणि मिलर 17 धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी पाच षटकांत 48 धावांची गरज होती. या जोडीने 15व्या षटकात 12 धावा केल्या. अशा स्थितीत हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला सहज विजय मिळवून देतील असे वाटत होते, मात्र 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिलरने पुल शॉट खेळला. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आत होता आणि मिलरला किमान दोन धावा मिळण्याची शक्यता होती, परंतु व्हॅन डेर मर्वेने माघारी फिरून एक अप्रतिम झेल घेतला आणि मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इथेच सामन्याला कलाटणी मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेला सामना गमवावा लागला.

व्हॅन डर मर्वे हा यापूर्वी आफ्रिकेकडून खेळला होता. त्याने आपल्या शानदार झेलच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर फेकले. आफ्रिकन खेळाडूने दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ग्रँट इलियटने 2015 च्या विश्वचषकात आपल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेर फेकले होते. इलियट न्यूझीलंडकडून खेळत होता. याआधी तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT