Rohan Bopanna and Matthew Ebden Sakal
क्रीडा

Rohan Bopanna: मियामी ओपनमध्येही बोपण्णाचा डंका! 44 व्या वर्षी एब्डेनसह विजेतेपद जिंकत रचला नवा विक्रम

Miami Open 2024: 44 वर्षीय रोहन बोपण्णाने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने मियामी ओपनचे विजेतेपद जिंकत नवा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Rohan Bopanna News: भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेनसह मियामी ओपन 2024 या एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

शुक्रवारी (30 मार्च) झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बोपण्णा आणि एब्डेन यांनी क्रोएशियाच्या इवान डोडिग व अमेरिकेचा त्याचा साथीदार ऑस्टीन क्रॅझीकेक या जोडीला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली.

1 तास 43 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात बोपण्णा - एब्डेन यांनी डोडिग-क्रॅझीकेक यांना 6-7(3), 6-3, 10-6 अशा फरकाने पराभूत केले.

बोपण्णा आणि एब्डेन यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर आता त्यांनी मियामी ओपन स्पर्धेतही विजेतेपद मिळवण्याचा कारनामा केला आहे.

याबरोबरच 44 वर्षीय बोपण्णा आणि एब्डेन पुन्हा जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकावर आले आहेत. याशिवाय बोपण्णा आणि एब्डेन यांचे एटीपी मास्टर्स 1000 लेव्हलचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी या जोडीने इंडियन वेल्स 2023 स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली होती.

याशिवाय आता बोपण्णाने एटीपी मास्टर्स 1000 लेव्हलचे विजेतेपद मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला आहे. हा विक्रम त्याने गेल्यावर्षी 43 वर्षे वय असताना इंडियन वेल्समध्ये केला होता. परंतु, आता त्याने 44 व्या वर्षी मियामी ओपन जिंकत नवा विक्रम प्रस्तापित केला.

अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित बोपण्णा आणि एब्डेन यांना तीन सेट पाँइंट्स मिळाले होते, परंतु दुसऱ्या मानांकित डोडिग-क्रॅझीकेक यांनी तगडी झुंज दिली. त्यामुळे सामना पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमवावा लागला.

परंतु, दुसऱ्या सेटमध्ये चांगले पुनरागमन बोपण्णा आणि एब्डेन यांनी केले आणि हा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली. टायब्रेकमध्ये बोपण्णा आणि एब्डेन यांनी 10-6 असा विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT