Rohan Bopanna Retirement paris olympics 2024 sakal
क्रीडा

Rohan Bopanna Retirement : "देशासाठी ही माझी शेवटची टूर्नामेंट..." पराभव लागला जिव्हारी! रोहन बोपण्णाने केली निवृत्तीची घोषणा

Rohan Bopanna Retirement News : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारतीय स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले.

Kiran Mahanavar

Rohan Bopanna Retirement Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारतीय स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाला पराभवाला सामोरे जावे लागले. बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या पुरुष दुहेरीच्या जोडीला रविवारी रात्री झालेल्या सामन्यात एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन आणि गेल मॉनफिल्स या फ्रेंच जोडीकडून 5-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर रोहन बोपण्णाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

या सामन्यातील पराभवानंतर बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. तो म्हणाला की, "देशासाठी निश्चितपणे ही माझी शेवटची स्पर्धा असेल. मला पूर्णपणे समजते की, मी आता कुठे आहे. त्यामुळे जोपर्यंत हे चालू आहे, तोपर्यंत मी टेनिस सर्किटवर आनंद घेत राहीन. 2002 मध्ये पदार्पण केल्यापासून 22 वर्षांनंतरही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. याचा मला खूप अभिमान आहे.

बोपण्णा आणि बालाजीच्या पराभवामुळे 1996 पासून टेनिसमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ कायम राहिला. बोपण्णा हा दुष्काळ 2016 मध्ये संपवण्याच्या जवळ आला होता. पण त्याची आणि सानिया मिर्झाची जोडी मिश्र स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली. बोपण्णा 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर राहणार आहे. त्याने आधीच डेव्हिस कपमधून निवृत्ती जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT