rohan Bopanna Australian Open men doubles title win-2-cr-prize money-marathi-news 
क्रीडा

Rohan Bopanna Australian Open: ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरल्यानंतर रोहन बोपन्ना झाला मालामाल, 'इतकी' मिळणार बक्षीस रक्कम

Rohan Bopanna Australian Open: रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत इतिहास रचला. आज (शनिवार, 27 जानेवारी) या जोडीने अंतिम फेरीत इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Sandip Kapde

Rohan Bopanna Australian Open:

रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत इतिहास रचला. आज (शनिवार, 27 जानेवारी) या जोडीने अंतिम फेरीत इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारताचा बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा एबडेन या जोडीने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले आहे. बोपन्ना आणि एबडेन यांनी हा सामना 7-6 (7-0), 7-5 असा जिंकला. दोघांनी पहिला सेट 7-6 (7-0) असा जिंकला जो टायब्रेकरपर्यंत गेला. यानंतर दुसरा सेट 7-5 अशा फरकाने जिंकला.

यासह रोहन बोपन्ना 2012 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा लिएंडर पेसनंतर दुसरा भारतीय ठरला. बोपन्ना आणि एबडेन यांना प्रत्येकी सुमारे 2 कोटीची बक्षीस रक्कम मिळेल. (Rohan Bopanna Australian Open)

43 वर्षीय बोपन्ना नुकताच पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कारासाठीही त्यांची निवड झाली होती. ओपन एरामध्ये ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपन्ना सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वयाच्या 43 वर्षे 329 दिवसांत तो चॅम्पियन बनला.

ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी स्पर्धेत रोहन बोपन्नाचा हा 61 वा सामना होता. त्याने 19 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत सामने खेळले आहेत. बोपन्नाने अमेरिकेच्या राजीव रामचा अनोखा विक्रम मोडला. पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद जिंकण्यापूर्वी बोपन्ना या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. राजीव रामला पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी 58 सामने लागले. बोपन्नाने आपल्या 61व्या सामन्यात हे विजेतेपद पटकावले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT