Rohit Sharma Ajit Agarkar have intense chat immediately after India beat England get Virat Kohli back cricket news in marathi  sakal
क्रीडा

Ind vs Eng : विराट शिवाय काही जमेना... मॅच जिंकूनही आगरकर अन् रोहित टेन्शनमध्ये, किंग कोहली येणार रिटर्न?

India vs England Series News 2024 : भारतीय कर्णधार रोहित शर्माला भारतीय संघात विराट कोहलीची उणीव भासत आहे. अशा परिस्थितीत....

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर आता दोन्ही संघांनी तिसऱ्या कसोटीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पण राजकोटमध्ये होणाऱ्या त्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना 10 दिवसांचा ब्रेक आहे. 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी इंग्लंड अबू धाबीला रवाना होत आहे, तर भारतीय खेळाडूही काही दिवस विश्रांती घेऊ शकतात.

भारताने इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सीमारेषेजवळ गप्पा मारताना दिसले, आणि त्यांच्यात बरीच चर्चा झाली. मालिकेदरम्यान दुखापतींच्या समस्येने भारतीय संघाला सर्व बाजूंनी घेरले आहे. रवींद्र जडेजा, केएल राहुल, शुभमन गिल यांना दुखापत झाली आहे.

तर विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी विश्रांती घेतल्याने भारतीय संघ काहीसा कमकुवत दिसत होता. त्यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा टेन्शनमध्ये आहे. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे? कोहली परतणार का? तो आला तर कोण बाहेर जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील.

रोहित आणि आगरकर यांच्यातील संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला आहे. विशाखापट्टणम कसोटी संपताच रोहित थेट संघ निवडक अजित आगरकर यांच्याशी बोलायला गेला. रोहित सीमारेषेजवळ बराच वेळ संघ निवडकर्त्यांशी बोलत होता. याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने अंदाज व्यक्त केला की, रोहितला कोहलीने लवकरच संघात परतावे असे वाटते.

केविन पीटरसन म्हणाला की, रोहित शर्माला संघात विराट कोहलीची उणीव भासत आहे, त्यामुळेच तिसऱ्या कसोटीत किंग कोहलीने कसे तरी पुनरागमन करावे, अशी त्याची इच्छा आहे. कोहलीशिवाय टीम इंडियासाठी दोन्ही कसोटी सामने खूपच कठीण झाले आहेत. रोहित कोणत्याही प्रकारे कोहलीला बोलावण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संघ दुखापतींच्या छायेखाली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर आहे. केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण पहिल्या कसोटीत त्याला दुखापत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT