Rohit Sharma and KL Rahul has more average than Rohit and Shikhar Dhawan 
क्रीडा

INDvsWI : रोहितचं आता राहुलसोबतच जास्त जमतं, कारण...

वृत्तसंस्था

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने अनेक विक्रम मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांमध्ये हे दोघे चौथ्या स्थानावर आहेत. मात्र सध्या आकडे काही वेगळेच सांगत आहेत. भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या भागीदारीची सरासरी रोहित-शिखरपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे. 

रोहित आणि शिखर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरासरी फक्त 44.3 आहे तर त्याचवेळी रोहित आणि राहुल यांची सरासरी 77.0 आहे. त्यामुळे सध्या रोहित आणि राहुलचीच जोडी भारतासाठी हीट ठरताना दिसत आहे. 

शिखर धवनचा खराब फॉर्म आणि त्याची दुखापत याच्यामुळे तो आधी ट्वेंटी20 आणि आता एकदिवसीय संघातूनही बाहेर गेला. दुसरीकडे त्याच्या अनुपस्थितीत सलामीला खेळण्याची संधी मिळालेल्या रोहुलने ट्वेंटी20 मालिकेतही छाप पाडली आणि आता एकदिवसीय मालिकेतही तो चांगली कामगिरी करत आहे. 

भारत आणि विंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शतकाजवळ आहे. तो 105.71च्या सरासरीने फलंदाजी करत आहे. त्याचसह रोहित शर्मा विश्वकरंडकापासूनच तुफान फॉर्मात आहे. तोही आजच्या सामन्यात शतकाच्या जवळ आहे. त्या दोघांनी मिळून नाबाद दिडशेहून जास्त धावांची भागीदारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT