Rohit Sharma and Virat Kohli given up business class Seat For Indian Pacer For rest and recover between games In T20 World Cup 2022 esakal
क्रीडा

Rohit Sharma: 'विराट' परंपरा रोहितने नेली पुढे; आपल्या बिजनेस क्लास सीटबाबत घेतला मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma and Virat Kohli Given Up Business Class Seat : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप खेळत आहे. ऑस्ट्रेलिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून खूप मोठा देश असल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळण्यासाठी संघांना खूप मोठा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, याच प्रवासात भारतीय वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी यासाठी भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली बिजनेस क्लासची सीट वेगवान गोलंदाजांना दिली आहे. तसेही वेगवान गोलंदाजांची उंची जास्त असते तसेच मोठ्या प्रवासात त्यांना पाय अखडून बसावे लागते. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली बिजनेस सीट वेगवान गोलंदाजांना देऊ केली आहे.

याबाबत भारतीय संघातील एका सहाय्यक सदस्याने सांगितले की, 'मैदानावर सर्वात जास्त श्रम हे वेगवान गोलंदाज करतात. त्यामुळे त्यांना प्रवासात त्यांचे पाय अखडून बसावे लागू नये म्हणून आम्ही स्पर्धेपूर्वी ठरवले की बीजनेस क्लास सीट त्यांना द्यायची.'

आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला 4 बिजनेस क्लास सीट मिळतात. या सीट सहसा संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार आणि व्यवस्थापक यांना दिली जाते. मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाला भारतीय संघाला प्रत्येक 3 ते 4 दिवसांनी प्रवास करावा लागतो याची जाणीव आहे. त्यामुळे सर्वाधिक श्रम करावे लागणाऱ्या वेगवान गोलंदाजांना या सीट देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, वेगवान गोलंदाजांना बिजनेस क्लासची सीट देण्याची ही परंपरा विराट कोहली कर्णधार होता तेव्हाही पाळली जात होता. त्यावेळी देखील वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. हीच चांगली परंपरा नवा कर्णधार रोहित शर्माने देखील कायम ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT