Rohit Sharma Captaincy Rated By Sunil Gavaskar esakal
क्रीडा

रोहितच्या कॅप्टन्सीला गावसकरांनी दिले किती मार्क?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजचा 6 विकेट्स राखून पराभव केला. भारताने आपल्या ऐतिहासिक 1000 व्या वनडे सामन्यावर विजयी मोहर उमटीवली. याचबरोबर वनडे टीमचा पूर्णवेळ कर्णधार झालेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील आपल्या कॅप्टन्सीचे अकाऊंट विजयाने उघडले. मात्र त्याने या सामन्यात दाखवलेल्या नेतृत्व कौशल्याचे मुल्यमापन होणे देखील गरजेचे आहे. हे मुल्यमापन भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केले आहे. (Rohit Sharma Captaincy Rated By Sunil Gavaskar)

वेस्ट इंडीजविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यानंतर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, 'त्याला अशाच प्रकारची जबरदस्त सुरूवात हवी होती. त्याने सामन्याच्या सुरूवातीपासूनच सगळे योग्य केले. विजयी सुरूवात तीही मोठ्या विजयाने कायम चांगलीच असते. त्याने विजयातही आपले योगदान दिले.'

सुनिल गावसकर यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला आणि बॅटिंगला रेटिंग देखील दिले आहे. सुनिल गावसकर यांनी रोहितला कालच्या सामन्यातील विजयाच्या आधारे 10 पैकी 9.99 गुण दिले. गावसकरांनी रोहितला पैकीच्या पैकी मार्क दिले नाहीत. त्यांना 0.1 मार्क राखून ठेवला आहे. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडीजला 43.5 षटकात 176 धावात गुंडाळले. यावेळी रोहित शर्मा खेळाडूंशी सातत्याने बोलत होता. त्याने फलंदाजीच्या हिशेबाने गोलंदाजीत बदल केले.

भारताने वेस्ट इंडीजने ठेवलेले 177 धावांचे आव्हान फक्त २२ षटकात चार विकेटच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने विजयात आपले मोठे योगदान जेत 51 चेंडूत 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT