Rohit Sharma Health SAKAL
क्रीडा

कोरोनामधून बरं झालेल्या रोहितने स्पष्टच सांगितलं! 'अभी तो ठीक हूं, पर...'

रोहितच्या नेतृत्वाखाली तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहेत.

Kiran Mahanavar

Rohit Sharma Update: इंग्लंड दौऱ्यावर गेल्यावर सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आला. बीसीसीआयने ट्विट करून रोहितला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. कोविड झाल्यामुळे रोहित पाचव्या कसोटी इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीही खेळू शकला नाही. आता मात्र, तो बरा झाला आहे आणि सराव पण सुरू केला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहेत.(Rohit Sharma Health Updates)

रोहितने टी-20 मालिकेच्या तीन दिवस आधी सरावाला सुरुवात केली आहे. मालिकेपूर्वी तब्येतीचे अपडेट देताना रोहित म्हणाला की, माझी रिकव्हरी चांगली होत आहे. मला कोविड होऊन ८-९ दिवस झाले आहेत. आता मी बरा, पण पुढे काय होईल हे माहीत नाही. मी तीन दिवसांपूर्वी सराव सुरू केला आहे. त्यामुळे ही मालिका खेळण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. रोहित शर्माने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत भाग घेतला नव्हता, त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा तो इंग्लंडला पोहोचला तेव्हा रोहित शर्माने सराव सामना खेळला. मात्र याच दरम्यान त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाची कमान त्याच्या जागी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT