rohit sharma crying after team india loss  
क्रीडा

Rohit Sharma : 'IPL मध्ये हेच खेळाडू दबावात चांगले खेळतात मात्र...' पाणावले रोहितचे डोळे

Kiran Mahanavar

Rohit Sharma T20 World Cup : 2022 च्या टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे, या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला आहे. रोहित शर्मा डगआउटमध्ये भावूक होताना दिसला, जिथे तो आपले अश्रू पुसत होता.

15 वर्षांनंतरही भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुपर-12 मध्ये चमकदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता, पण इथे टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरले. आम्ही गोलंदाजीत योग्य कामगिरी करू शकलो नाही, असे कर्णधार सामन्यानंतर म्हणाला.

रोहित शर्मा म्हणाला, आजचा दिवस खूपच निराशाजनक होता. शेवटच्या षटकात आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. नॉकआऊट सामन्यांमध्ये दडपण सहन करणे ही निव्वळ बाब होती. ही परिस्थिती समजून घेण्यासाठी सर्व खेळाडूंनी पुरेसे क्रिकेट खेळले आहे. आयपीएलदरम्यान अनेक खेळाडूंनी दबावाचे सामने खेळले आहेत. गोलंदाजी करताना आम्ही दडपणाखाली दिसलो. त्यांचे श्रेय सलामीवीर यांना द्यावे लागेल. दोघांनीही शानदार फलंदाजी केली. माझ्या मते पहिल्या षटकापासून स्विंग येत होते पण आम्ही योग्य दिशेने गोलंदाजी केली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आम्ही दडपण दूर केले. बांगलादेशविरुद्धही असेच काहीसे घडले, पण आज आपण ते करू शकलो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT