IND vs NZ Rohit Sharma Toss  esakal
क्रीडा

IND vs NZ Rohit Sharma : इसरलंय! रोहितने टॉसदरम्यान घातला घोळ, नशीब आठवलं नाही तर...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ Rohit Sharma Toss : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूर येथे खेळवला जात आहे. या स्टेडियमवरील हा पहिलाचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल याबाबत अजून अंदाज आलेला नाही. यादरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकली. मात्र रोहित शर्मा आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी हेच विसरला होता.

रायपूर येथील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेक केली. रोहित शर्माने हेड वर कौल लावला आणि तो लागलाही. जवागल श्रीनाथने रोहितला नाणेफेक जिंकल्याचे सांगितले.

मात्र रोहितला आपण फलंदाजी करायची आहे की गोलंदाजी हेच आठवेना. त्यामुळे तो काही काळ थांबला. त्याने डोक्याला हात लावला. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम रोहित करतोय काय असे भाव चेहऱ्यावर ठेवत त्याच्याकडे पाहत होता. दुसरीकडे श्रीनाथही अवाक झाला होता.

अखेर रोहित शर्माला दोन मिनिटांनी आठवलं की आपल्याला गोलंदाजी करायची आहे. रोहितने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे पाठीमागे भारतीय संघही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव घेऊन उभे होते. रोहितने गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

टॉस झाल्यानंतर रवी शास्त्री यांच्यासोबत बोलताना रोहित म्हणाला की मी टॉस जिंकल्यावर काय करायचा निर्णय घेतलाय हेच विसरलो. संघासोबत याबाबत खूप चर्चा झाली होती. मात्र मी ऐनवेळी काय निर्णय घेतला आहे तेच विसरलो.'

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिल्या सामन्यातील संघात कोणताही बदल केलेला नाही.

भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

(Sports Latest News)

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: विराट कोहलीमुळे उडाला गोंधळ; Vizag मध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांची दमछाक अन्...

Vladimir Putin Interview : रशियाने खरंच मोदींच्या हत्येचा कट उधळला? 'त्यादिवशी' कारमध्ये काय चर्चा झाली? पडद्यामागची गोष्ट समोर...

Marathi Breaking News LIVE: पुणे विमानतळावर विमान सेवेला मोठा फटका

Putin India visit: पुतीन यांच्या स्वागताला मुंबईचा पांढरा हत्ती! मोदींनी का निवडली टोयोटा फॉर्च्यूनर?

Viral Video: 'माझ्या बॉसला सांगा की मला कामावरून काढून टाकू नका', Indigo चं उड्डाणं रद्द झाल्यावर विमानतळावरील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT