IND vs AUS esakal
क्रीडा

IND vs AUS : सरावावेळी रोहित शर्माने खेळपट्टीबाबत दिली हिंट; द्रविडसोबत केली दीर्घ चर्चा

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघामध्ये रविवारी वर्ल्डकप 2023 ची फायनल होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून तेथील खेळपट्टी कशी असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने सरावादरम्यान फायनलच्या खेळपट्टीबाबत हिंट दिली.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फायनलसाठीची खेळपट्टी ही फिरकीला साथ देणार असण्याची शक्यता आहे. कारण आज ऐच्छिक सरावसत्रावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने फिल्डिंग कोच टी दिलीप यांच्यासोबत क्लोज स्पिप कॅचेसची प्रॅक्टिस केली आहे. ही स्पिल पोजिशन फिरकी गोलंदाजीसाठी वापरण्यात येते. यावर रोहितने लो कॅचेसचा देखील सराव केला. त्यामुळे खेळपट्टीवरील उसळी देखील कमी असेल तसेच ती थोडी संथ देखील असण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातील मोजकेच खेळाडू आज ऐच्छित सराव सत्राला हजर होते. या मोजक्यात खेळाडूंसोबत कोचिंग स्टाफ देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. यावेळी कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी खेळपट्टीचे निरीक्षण करून त्याच्यावर दीर्घ चर्चा केली.

ऐच्छिक सराव सत्राला हजेरी लावणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, रविंद्र जडेजा, केएल राहुल आणि इशान किशन या 6 खेळाडूंचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT