Rohit Sharma Virat Kohli esakal
क्रीडा

Rohit Sharma Virat Kohli : विराट कोहलीबद्दलच्या 'त्या' प्रश्नावार रोहित शर्मा जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना हा आज (दि. २७) बार्बाडोस येथे होत आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याला विराट कोहलीबाबतच्या विदेशातील फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहलीने नुकतेच वेस्ट इंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत शतकी खेळी केली आहे. त्याने 5 वर्षानंतर विदेशात शतकी खेळी केली. (India Vs West Indies 1st ODI)

पत्रकार परिषदेत रोहितला विराट कोहलीच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहितला विराट मोठी खेळी करू शकत नव्हता ही एक डोकेदुखी होती का असे विचारण्यात आले. (Rohit Sharma Press Conference)

यावर रोहित भडकला आणि म्हणाला, 'मी या प्रश्नाचे अनेकवेळा उत्तर दिले आहे. या सर्व बाहेरच्या गोष्टी आहेत. आमच्या संघात काय होते हे आम्ही जाणतो. आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आम्हाला सामना आणि मालिका जिंकण्याशी मतलब आहे. कोण काय म्हणतंय याचा आम्हाला काही फरक पडत नाही.' (Virat Kohli News)

रोहित शर्माचे कसोटी पाठोपाठ वनडे मालिका देखील खिशात घालण्याचा इरादा आहे. तो म्हणाला की, 'यावेळी प्राथमिकता ही वनडे मालिका जिंकण्याकडे आहे. आम्ही अनेकवेळा सांगितले आहे की संघातील गोष्टी आम्ही संघात ठेवू इच्छितो पुढेही असंच होईल.'

विराट कोहलीने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्याने 2018 नंतर पहिल्यांदाच विदेशात शतकी खेळी केली.

भारताने विंडीजविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या दसोटीत देखील भारत विजयी मार्गावर होता. मात्र पाचव्या दिवशी संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला. यामुळे कसोटी सामना ड्रॉ झाला. भारताने मालिका 1 - 0 अशी जिंकली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT