(Rohit Sharma Have a Chance To surpass Former Captain Mohammad Azharuddin ODI runs Record)
(Rohit Sharma Have a Chance To surpass Former Captain Mohammad Azharuddin ODI runs Record)  esakal
क्रीडा

रोहित शर्माला माजी कर्णधार अझहरूद्दीनचे रेकॉर्ड मोडण्याची संधी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: भारताचा पूर्णवेळ एकदिवसीय कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्मा आपली पहिली मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी (India vs West Indies) फिट झाला आहे. तो भारताचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत त्याला भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनचे (Mohammad Azharuddin) एक मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. (Rohit Sharma Have a Chance To surpass Former Captain Mohammad Azharuddin ODI runs Record)

मोहम्मद अझहरूद्दीनने १९८५ ते २००० दरम्यान भारताकडून ३३४ सामने खेळले होते. त्यातील ३०८ डावात फलंदाजी करत त्याने ३६.९२ च्या सरासरीने ९३७८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ शतके आणि ५८ अर्धशतकेही ठोकली होती. रोहित शर्माच्या नावावर सध्या ९२०५ एकदिवसीय धावा आहेत. (Rohit Sharma ODI Runs) वेस्ट इंडीज विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत जर रोहित शर्माने १७४ पेक्षा जास्त धावा केल्या तर तो माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनला मागे टाकेल. याचबरोबर रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय धावा करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहचेल.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Schin Tendulkar) नावावर आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) नंबर लागतो. विराटच्या सध्या १२२८५ एकदिवसीय धावा झाल्या आहेत. त्या खालोखाल तिसऱ्या स्थानावर सौरभ गांगुली (११२२१), चौथ्या स्थानावर राहुल द्रविड (१०७६८), पाचव्या स्थानावर एमएस धोनी (१०५९९), सहाव्या स्थानावर मोहम्मद अझहरूद्दीन (९३७८) आणि सातव्या स्थानवर रोहित शर्मा (९२०५) यांचा नंबर लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT