Rohit Sharma IND vs AUS 3rd Test
Rohit Sharma IND vs AUS 3rd Test  esakal
क्रीडा

Rohit Sharma : रोहितने पराभवाचे खापर कोणाच्या माथी फोडले; सामन्यानंतर कर्णधार म्हणाला तरी काय?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सनी जिंकला. या विजयाबरोबर मालिका 2 - 1 अशी आली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल आता अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत लागणार आहे. भारताने इंदूर कसोटीत दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली नाही.

भारताचा अडीच दिवसात पराभव झाल्याने संघावर टीका होत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये पराभवाची कारणे सांगितली. रोहित शर्माला अशा खेळपट्ट्यांवर एखादुसरा सामना आपल्या बाजूने जाणार नाही याची कल्पना होती.

रोहित शर्मा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हणाला, 'ज्यावेळी आपण कसोटी सामना गमावतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपण बरोबर केलेल्या नसतात. नक्कीच आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली नाही. आम्हाला समजलं पाहिजे की पहिल्या डावात धावा करणे खूप गरजेचे असते. ज्यावेळी त्यांनी 80 - 90 धावांची आघाडी घेतली. आम्हाला दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करणे गरजेचे होते. मात्र आम्हाला ते जमले नाही. जर आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली असती तर चित्र वेगळे असते.'

रोहित पुढे म्हणाला की, 'आम्ही आताच अहमदाबाद कसोटीचा विचार करत नाहीये. दुसरा कसोटी सामना आतच संपला आहे. आम्हाला विचार करायला थोडा वेळ लागेल. आपल्याला समजले पाहिजे की खेळपट्टी कशीही असू दे आपल्याला आपले काम करावेच लागेल. ज्यावेळी तुम्ही अशा आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर खेळता त्यावेळी तुम्हाला धाडसी रहावे लागले.'

नॅथन लायनबद्दल रोहित म्हणाला की, 'मला असे वाटते की आम्ही त्यांच्या गोलंदाजांना एका टप्प्यावर गोलंदाजी करण्याची मुभा दिली. मी लायनचे श्रेय काढून घेत नाहीये. मात्र ज्यावेळी गोलंदाज एकाच स्पॉटवर गोलंदाजी करतो त्यावेळी तुम्हाला वेगळी रणनिती आखावी लागले.'

रोहित म्हणाला की, एखादा असा सामना येतोच मात्र काही खेळाडूंनी उभं राहून संघाला अशा परिस्थितीतून बाहेर काढलं पाहिजे. आम्ही रणनिती कार्यान्वित करण्यात अपयशी ठरलो पुढे सामन्यात काय झाले हे तुम्हाला माहिती आहेच.

(Sports Latest News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT