Rohit Sharma 
क्रीडा

IND vs BAN : कर्णधार रोहितनं दुसऱ्याच षटकात सोडलं मैदान! काय झालं नेमकं?

Kiran Mahanavar

Rohit Sharma IND vs BAN : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि कॅप्टन रोहित शर्मा सध्या आपल्या खराब फॉर्मशी झगडत आहे. दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला दुखापत झाली आहे. रोहित शर्मासोबत ही घटना बांगलादेशच्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर इनामुल हकने एक शॉट खेळला आणि चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला, पण यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. बोट रक्तबंबाळ झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

रोहित शर्माच्या हातात चेंडू कदाचित नीट आला नाही, त्यामुळे त्याला दुखापतही झाली. या दुखापतीनंतर रोहित शर्मा मैदानाबाहेर गेला. त्याच्या बोटातून रक्त येत होते. मात्र झेल सोडल्याने संघाचे फारसे नुकसान झाले नाही कारण पुढच्याच चेंडूवर सिराजने एनामुल हकला एलबीडब्ल्यू आऊट केले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले असून शाहबाज अहमदच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. तर कुलदीप सेन निवडीसाठी उपलब्ध नसल्याने स्पीड गन उमरान मलिकला संधी मिळाली आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर - उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमारन मलिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT