rohit sharma kapil dev comments virat kohli place t20i
rohit sharma kapil dev comments virat kohli place t20i  esakal
क्रीडा

कपिलदेव म्हणतो विराटला हाकला, रोहितने दिले उत्तर...

धनश्री ओतारी

विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या अंतिम टी २० सामन्यातही कायम राहिली. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्याची खराब कामगिरी पाहता अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्याला ब्रेक घेण्याता सल्ला दिला आहे तर काहींनी त्यांला संघातून बाहरे काढा असा सल्ला दिला आहे. दरम्यान, त्याचा मित्र वजा सहकारी खेळाडू रोहित शर्माने त्याची पाठराखण केली आहे.(rohit sharma kapil dev comments virat kohli place t20i)

इंग्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ 12 धावा करता आल्या. त्याच्या या अपयशी खेळीवर काहीदिवसांपूर्वी कपिव देव यांनी एका निवेदनातून आपले मत व्यक्त केले होते. "जेव्हा क्रमांक दोनचा गोलंदाज असलेल्या आर अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराट कोहलीला टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही, कारण तो सध्याच्या सेटअपमध्ये फिट नाही.

"जर विराट कामगिरी करत नसेल तर तुम्ही दीपक हुड्डासारख्या तरुणांना बाहेर ठेवू शकत नाही. त्याला पुन्हा खेळवण्याची गरज आहे. असेही कपिल देव यांनी म्हटले होते.

दरम्यान, रोहित शर्माने कपिल देव यांच्या वक्तव्यावर उत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत रोहित बोलत होता. "ते बाहेरून खेळ पाहत आहेत आणि आत काय चालले आहे ते त्यांना कळत नाही. आमची स्वतःची विचार प्रक्रिया आहे. आम्ही आमची स्वतःची टीम बनवतो आणि त्यामागे खूप विचार असतो. आम्ही खेळाडूंना सपोर्ट करतो आणि त्यांना संधी देतो. अशा स्थितीत तुम्हाला या गोष्टी बाहेरून कळत नाहीत. म्हणून बाहेर काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही, तर आत काय घडते आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

तसेच, ज्यावेळी फॉर्म येतो तेव्हा प्रत्येकजण चढ-उताराचा सामना करत असतो. खेळाडूच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. म्हणूनच आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेव्हा एखादा खेळाडू इतकी वर्षे चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा एक किंवा दोन वाईट मालिका त्याला वाईट खेळाडू बनवत नाही. आपण त्याच्या मागील कामगिरीकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही जे संघात आहोत त्यांना खेळाडूचे महत्त्व माहित आहे. त्यांना याबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र, त्या गोष्टींना आम्ही महत्त्व देत नाही. अशा शब्दात रोहितने विराटची पाठराखण करत क्रिकेट तज्ज्ञांना उत्तर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT