India complete a 3-0 clean sweep ICC Twitter
क्रीडा

IND vs SL : अय्यरसह टीम इंडियाची हॅटट्रिक; लंकेलाही चारली धूळ!

सकाळ डिजिटल टीम

India vs Sri Lanka, 3rd T20I : श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना सतराव्या षटकातच खिशात घातला. या विजयासह भारतीय संघाने श्रीलंकेलाही व्हाईट वॉश दिला. घरच्या मैदानावरील टी-20 मालिकेत भारतीय संघाने सलग तिसरी मालिका एकहाती आपल्या नावे केलीये. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली होती. या विजयासह रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील व्हाइट वॉशचा धडाका टीम इंडियाने (Team India) कायम ठेवला. श्रेयस अय्यरच्या तीन सामन्यातील तीन अर्धशतकासह भारतीय संघाने तीन टी-20 मालिकेत पाहुण्यांना व्हाईट वॉश दिला. याआधी टीम इंडियाने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजचा धुरळा उडवला होता. (India complete a 3-0 clean sweep sri lanka )

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शनाका याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय व्यर्थ ठरवला. आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करत आघाडीच्या गड्यांना स्वस्तात माघारी धाडले. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी शनाकावर एकाकी झुंज देण्याची वेळ आली. श्रीलंकेचा संघ शंभर धावाही करणार नाही, असे वाटत असताना शनाकाने अर्धशतकी खेळी साकारली. त्याने केलेल्या 74 धावांच्या जोरावर श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकात 5 बाद 146 धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (5) एकेरी धावेवरच तंबूत परतला. दुखापतग्रस्त ईशान किशनच्या जागेवर टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसनलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. तो 18 धावा करुन तंबूत फिरला. दीपक हुड्डा 21 आणि व्यंकटेश अय्यर 5 धावा करुन माघारी फिरले. श्रेयस अय्यरनं 45 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या बाजूला रविंद्र जाडेजाने15 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यातील मालिकेत तिसरे अर्धशतक ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT