Rohit Sharma After Ind vs Aus Match sakal
क्रीडा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, मला अशी अपेक्षा नव्हती...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

Rohit Sharma After Ind vs Aus Match : नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले होते. जे यजमान भारताने शेवटच्या षटकात चार विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

भारताकडून कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावा केल्या. 20 चेंडूंच्या झंझावाती खेळीत हिटमॅनने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्याचबरोबर या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मी अशी फलंदाजी करेन, अशी अपेक्षा नव्हती. मी गेल्या 8-9 महिन्यांपासून कधी अशी फलंदाजी केली नाही. एवढ्या छोट्या स्पर्धेत तुम्ही जास्त नियोजन करू शकत नाही. आमच्या संघाने चांगली गोलंदाजी केली. मैदानावर दवही आले होते, त्यामुळे हर्षलच्या हातातून काही बॉल फुल टॉसही गेले. बुमराहने महत्त्वाच्या वेळी चांगली गोलंदाजी करत विकेट्स मिळवल्या आणि मला आनंद आहे की दिनेशने सामना शानदारपणे संपवला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT