Rohit Sharma lost DRS because of virat kohli advice
Rohit Sharma lost DRS because of virat kohli advice  esakal
क्रीडा

VIDEO: विराटचा सल्ला ऐकला अन् रोहित फसला

अनिरुद्ध संकपाळ

भारताने वेस्ट इंडीजचा (India vs West Indies 1st T20I) पहिल्या टी 20 सामन्यात 6 विकेट्स राखून पराभव केला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेची विजयी सुरूवात केली. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करत वेस्ट इंडीजला 157 धावात रोखले. दरम्यान, वेस्ट इंडीज फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) एक सल्ला ऐकला. मात्र हा निर्णय रोहितवरच उलटला. (Rohit Sharma lost DRS Because of Virat Kohli Advice)

सामन्याचे 8 वे षटक भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई टाकत होता. त्यावेळी रोस्टन चेस लेग स्टम्पवरील चेंडू खेळताना हुकला. चेंडू ऋषभ पंतच्या ग्लोजमध्ये विसावला. बिश्नोईने चेंडू बॅटला लागला असल्याचा अंदाज व्यक्त करत अपील केली. स्लीपमध्ये असलेला रोहित याबाबत साशंक होता. मात्र माजी कर्णधार विराट कोहलीने त्याला सांगितले की दोन आवाज आले आहेत मी सांगतोय तू रिव्ह्यू (DRS) घे. रोहितने विराटचा सल्ला ऐकला आणि तो तेथेच फसला. रिव्ह्यूमध्ये (DRS) चेंडू रोस्टन चेसच्या पॅडला लागून गेल्याचे दिसले. त्यामुळे भारताचा रिव्ह्यू खराब झाला. हे सर्व संभाषण स्टम्प माईकमध्ये कैद झाले. सध्या याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडीजने भारतासमोर 20 षटकात 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य 18.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 19 चेंडूत 40 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 18 चेंडूत 34 धावा तर व्यंकटेश अय्यरने 13 चेंडूत 24 धावा ठोकत भारताचा विजय साकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT