Rohit Sharma Hardik Pandya Captain  esakal
क्रीडा

Hardik Pandya Captain: रोहितला हटवण्याची तयारी सुरू; श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिकचा होणार राज्याभिषेक

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Captain : भारताची ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीनंतर संघात नेतृत्व बदलाच्या चर्चांना ऊत आला होता. आता बीसीसीआयच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माला टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडसमितीने रोहित शर्माला टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचे जवळपास ठरवले आहे. भारतीय टी 20 संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून कळते आहे. मात्र वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व रोहितकडेच राहणार आहे.

इनसाईड्स स्पोर्ट्सनुसार बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले की, 'आता संघात बदल करण्याची वेळ आली आहे. आम्हा अजूनही वाटते की रोहित शर्मा अजूनही बरेच काही देऊ शकतो. मात्र त्याच्या खांद्यावर जबाबदारींचे मोठे ओझे आहे. रोहितचे वय वाढत चालले आहे हे देखील लक्षात ठेवायला हवे. 2024 च्या टी 20 वर्ल्डकपची आम्हाला तयारी करायची आहे. हार्दिक नेतृत्व करण्याच्या भुमिकेसाठी योग्य आहे. निवडसमिती पुढच्या टी 20 मालिकेपूर्वी बैठक घेऊन हार्दिक पांड्या भारताच्या टी 20 संघाचा नवा कर्णधार असेल अशी घोषणा करू शकते.'

हार्दिक पांड्या सध्या न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी देखील त्याने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र न्यूझीलंडविरूद्ध युवा संघ घेऊन खेळणे आव्हानात्मक असणार आहे. हार्दिक पांड्याची ही मोठी परीक्षा असेल. याचबरोबर कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची देखील चांगली संधी असेल. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील आता रोहितला हटवून हार्दिक पांड्याकडे टी 20 संघाचे नेतृत्व देण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले होते. अनेक वरिष्ठ खेळाडूंनी देखील याबाबची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT