Rohit sharma meet the injured little girl  sakal
क्रीडा

रोहितने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, 'त्या' मुलीला दिली चॉकलेटची भेट

Video : रोहितचा षटकार थेट लहान मुलीला लागला अन् इंग्लंडचे फिजिओ...

Kiran Mahanavar

ENG vs IND 1st ODI : टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने आफलातून खेळी केली. मात्र यादरम्यान रोहित शर्माचा पुल शॉटवर चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि स्टँडवर बसलेल्या एका चिमुरडीवर लागला. त्यामुळे पाचव्या षटकात नंतर सामना काही काळ थांबवावा लागला.(Rohit sharma meet the injured little girl & gift her chocolate)

रोहित शर्माने भारतीय डावाच्या 5व्या षटकात डेव्हिड विलीचा चेंडू जबरदस्त षटकार ठोकला. चेंडू प्रेक्षकांच्या मधोमध बसलेल्या एका छोट्या मुलीला लागला. पंचांनी षटकाराचा इशारा दिल्यानंतर कॅमेरामनने पुन्हा कॅमेरा स्टँडकडे वळवला मग सर्वांना कळाल. रोहित शर्माने सामना संपल्यानंतर मुलीकडे गेला काळजी घेत तिला एक चॉकलेटही भेट म्हणून दिले.

या घटनेनंतर इंग्लंडच्या फिजिओ स्टाफने मुलीवर उपचार करण्यासाठी धाव गेला, त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहतेही इंग्लंडच्या फिजिओ स्टाफचे कौतुकही करत आहेत.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली. या सामन्यात त्याने 58 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतासमोर केवळ 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT