Rohit Sharma T20 World Cup cricket news  sakal
क्रीडा

T20 World Cup : परिस्थिती! 11 वर्षाच्या मुलाला रोहितने विचारले भारताकडून खेळशील का?

पर्थमध्ये 11 वर्षाच्या मुलाच्या गोलंदाजी रोहित शर्माने जिंकले मन

Kiran Mahanavar

T20 World Cup Rohit Sharma : टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेनला पोहोचला आहे. भारताचे सर्व खेळाडू या सामन्याच्या तयारीत व्यस्त असून कर्णधार रोहित शर्मा आपल्या खेळाडूंचे नेतृत्व करत आहे. दरम्यान रोहितने मैदानामध्ये एका 11 वर्षाच्या मुलाला गोलंदाजी करताना पाहिल्यावर त्याच्या हावभावाने सर्वांची मने जिंकली.

रोहितची नजर द्रशील चौहान नावाच्या 11 वर्षीय गोलंदाजावर पडली. भारतीय कर्णधाराने त्यानंतर त्या लहान गोलंदाजाला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावले आणि नंतर नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सांगितले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये 11 वर्षीय गोलंदाज सांगत आहे की, त्याचा आवडता चेंडू इनस्विंग यॉर्कर आणि आऊटस्विंगर आहे. रोहितने त्याला विचारले भारतीय संघात खेळायला आवडेल का?. यावर द्राशिल म्हणाला की, मला क्रिकेटर व्हायचे आहे, पण तो भारत दौऱ्यावर कधी येईल हे माहित नाही.

11 वर्षीय या गोलंदाजाच्या अ‍ॅक्शनने रोहित खूपच प्रभावित झाला आहे. नेट प्रॅक्टिसनंतर हिटमॅनने हा ऑटोग्राफही वेगवान गोलंदाजाला दिला. सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅप्टन हिटमॅन 11 वर्षांच्या बॉलरच्या बॉलचा नेटमध्ये सामना करताना दिसत आहे.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला ब्रिस्बेनमध्ये दोन सराव सामने खेळायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT