Rohit Sharma World Cup 2023 sakal
क्रीडा

Rohit Sharma : नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? कर्णधार रोहित म्हणाला, 'गरज नसताना आमचे...'

Kiran Mahanavar

Rohit Sharma World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाने सर्व लीग सामने जिंकून आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. गेल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवत टीम इंडियाने विजयी मोहीम सुरू ठेवली होती.

भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये जिंकण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. सलग 8 विजय नोंदवल्यानंतर, नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना खेळलेल्या टीम इंडियाने 160 धावांचा मोठा विजय मिळवून लीग टप्पा पूर्ण केला. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या स्फोटक शतकी खेळीच्या जोरावर भारताने 4 विकेट्सवर 410 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात नेदरलँड्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण संघ 250 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने एक-दोन नव्हे तर 9 गोलंदाजांना संधी दिली, ज्यामध्ये तो स्वतःही सामील होता.

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजीत हात आजमावला. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहितला याबाबत विचारले असता तो म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे फक्त 5 गोलंदाज असतात, तेव्हा तुम्ही तुमच्या संघात काही पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आज आमच्याकडे 9 पर्याय होते. आजचा सामना ज्यामध्ये आम्ही काही गोष्टी करून पाहिल्या, हे खूप महत्त्वाचे आहे. गरज नसताना आमचे वेगवान गोलंदाज वाईड यॉर्करचा प्रयत्न करत होते. बॉलिंग युनिट म्हणून आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होतो. यातून काय साध्य करता येईल हे पाहायचे होते.

भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजांव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी केली. दोघांना 1-1 विकेट मिळाली. विराट कोहलीने 3 षटकात 13 धावा देऊन 1 बळी घेतला तर कर्णधार रोहितने केवळ 5 चेंडू टाकले आणि 1 बळी घेतला. त्याने नेदरलँडची शेवटची विकेट घेतली ज्यासाठी त्याने 7 धावा खर्च केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Sale : डीमार्टमध्ये कोणत्या दिवशी वस्तू खरेदी करणे जास्त स्वस्त आणि फायद्याचे ठरते? जाणून घ्या एका क्लिकवर

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Sale : सारा जमाना Zudio का दिवाना! पण फक्त झुडिओ नाही, तर टाटाच्या 'या' 5 दुकानांमध्ये मिळतोय हजारोंचा डिस्काउंट; स्पेशल ऑफर्स पाहा

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

SCROLL FOR NEXT