Rohit Sharma IND vs NZ  ESAKAL
क्रीडा

Rohit Sharma : रोहितमुळं रिझवान पुन्हा निराश, भारतीय कर्णधारानं 33 वी धाव घेतली अन्...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma IND vs NZ : न्यूझीलंडने ठेवलेल्या 274 धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरूवात केली. या सुरूवातीचे श्रेय हे भारताचा कर्णधार रोहित शर्माला जाते. त्याने आक्रमक फलंदाजी करत 40 चेंडूत 46 धावा ठोकल्या. त्याने शुभमन गिलच्या साथीने 71 धावांची सलामी दिली.

यादरम्यानच रोहित शर्माने आपली 33 वी धाव पूर्ण करताच तो पुन्हा एकदा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजी ठरला. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला खाली खेचले. रोहित शर्मा आता यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

वर्ल्डकप 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • रोहित शर्मा - 311 धावा

  • मोहम्मद रिझवान - 294

  • रचिन रविंद्र - 290

  • विराट कोहली - 283*

  • डॅरेल मिचेल - 268

जरी सध्या रोहित शर्माने मोहम्मद रिझवानला मागे टाकत वर्ल्डकप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं असलं तरी विराट कोहली देखील काही मागे नाही. तो न्यूजीलंडविरूद्धच्या सामन्यात अजून खेळत असून तो 290 धावांच्या जवळ पोहचला आहे. त्यामुळे तो रचिन, रिझवान आणि रोहित शर्माला देखील मागे टाकून यादीतलं अव्वल स्थान पटकावू शकतो.

रोहित शर्माने धावांसोबतच षटकारांच्या बाबतीत देखील एक माईल स्टोन पार केला. रोहित शर्मा आता वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले. आज त्याने 4 षटकार आणि 4 चौकार मारले.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार

  • ख्रिस गेल - 49 षटकार

  • रोहित शर्मा - 38 षटकार

  • एबी डिव्हिलियर्स - 37 षटकार

  • रिकी पॉटिंग - 31 षटकार

  • ब्रँडन मॅक्युलम - 29 षटकार

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

Women's World Cup: पोरींची अभिमानास्पद कामगिरी! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंसाठी TATA ची मोठी घोषणा

Ratnagiri Political : रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

IRCTC Recruitment 2025: IRCTC मध्ये ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, पगार आणि मुलाखतीचे ठिकाण

SCROLL FOR NEXT