Rohit Sharma Virat Kohli Video :  sakal
क्रीडा

Virat Kohli : पाकविरूद्ध विजयी भार पेलणाऱ्या विराटला हिटमॅनने घेतले खांद्यावर, पहा Video

Kiran Mahanavar

Rohit Sharma Virat Kohli Video : पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात किंग कोहलीला 'किंग' का म्हणतात हे सिद्ध केले आहे. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी खेळली करत टीम इंडियाला हरवलेला सामना जिंकून दिला. 154.72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना विराट कोहलीने आपल्या डावात 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचवेळी विजयानंतर रोहित शर्मा आणि त्याची मित्र पाहण्यासारखा होती.

टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 धावांची गरज होती. आर अश्विनने सिंगल घेताच नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या विराटची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. विराट कोहली उडी मारून हा विजय साजरा करताना दिसला. त्याचवेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डगआउटमधून धावत आला आणि त्याने विराट कोहलीला खांद्यावर उचलून घेतले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली याआधी क्वचितच असे सेलिब्रेशन करताना दिसले आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 159 धावा केल्या. टीम इंडियासाठी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याच्या खात्यात 3-3 विकेट आल्या. टीम इंडियाने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावांचा पाठलाग केला. विराट कोहलीशिवाय हार्दिक पांड्यानेही 40 धावांची शानदार खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Ganesh Kale Murder: गणेश काळेला मारेकऱ्यांनी का निवडलं? मोठं कारण उघडकीस; टोळीयुद्धाला आणखी पेट?

शाहरुख खान कधीच काश्मीरला का गेला नाही? वडील ठरले कारण, म्हणाला, 'त्यांनी सांगितलेलं की बेटा तू...

Women's World Cup: भारत-द. आफ्रिका पहिल्या विजेतेपदासाठी भिडणार, पण पाऊस घालणार खोडा? रिझर्व्ह डे असणार की नाही? जाणून घ्या

Sunday Special Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा बनाना चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT