Rohit Sharma pointing fingers at the media after asked about Virat Kohli batting Form  esakal
क्रीडा

'फॉर्मची चिंता...' कर्णधार रोहितने विराटची केली पाठराखण

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील टी 20 मालिकेला उद्यापासून ( दि. 16) सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याला विराट कोहलीच्या खराब बॅटिंग (Virat Kohli Batting Form) फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्याने माध्यामांनाच फटकारले. त्याने सांगितले की संघ व्यवस्थापनाला विराट कोहलीच्या फॉर्मबाबत कोणतीही काळजी नाहीये.

विराट कोहलीला वेस्ट इंडीज बरोबरच्या वनडे मालिकेत 3 सामन्यात फक्त 26 धावा करता आल्या. त्याने 2015 पासून पहिल्यांदाच एका द्विपक्षीय मालिकेत 50 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. विराटच्या या खराब फॉर्मच्या बाबतीत रोहित शर्माला विचारणा झाली. त्यावेळी त्याने 'मला वाटते की हे माध्यमांनीच सुरू केलं आहे. तुमच्या बाजूने जी काही बडबड सुरू आहे ती थांबली तर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाईल.'

रोहित पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की तो चांगल्या स्थितीत आहे. तो गेल्या दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. त्यामुळे त्याला परिस्थिती कशी हाताळायची याची जाण आहे. त्यामुळे जे काही सुरू केलं आहे ते तुम्ही सुरू केलं आहे. तुम्ही जर शांत बसला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील.'

रोहित वनडे मालिका (ODI Series) झाल्यानंतर पत्रकार परिषदेत हास्यविनोद करत म्हणाला होता की, 'विराट कोहलीला अजून आत्मविश्वासाची गरज आहे का? जर विराट कोहलीला आत्मविश्वासाची गरज असेल तर मग संघातील कोणता खेळाडू आत्मविश्वासाने भरलेला असेल? त्याला माहिती आहे की त्याने बराच काळापासून शतक ठोकलेले नाही मात्र तो अर्धशतक तरी करतोय की नाही. दक्षिण आफ्रिकेत त्याने 3 सामन्यात 2 अर्धशतके ठोकली आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT