Ravindra Jadeja Yash Dhull And Rohit Sharma Instagram
क्रीडा

टीम इंडियाच्या मोठ्या कॅप्टनसोबत छोटा कॅप्टन; फोटो व्हायरल

सोशल मीडियावर ग्रेट भेटीच्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसताहेत.

सुशांत जाधव

टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सध्या बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आहेत. या दरम्यान त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही दोघही भारतीय अंडर 19 संघाचा कर्णधार (India U-19 captain) यश धूल (Yash Dhull ) याच्यासोबत दिसत आहेत. यश धूलने सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित आणि जाडेजासोबतच्या ग्रेट भेटीचा फोटो शेअर केलाय. सोशल मीडियावर या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसताहेत.

भारतीय अंडर 19 संघ आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. 23 डिसेंबरपासून युएईमध्ये आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अंडर 19 संघाच्या कर्णधाराची रोहित आणि जाडेजासोबत घालवलेला वेळ युवा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण निश्चितच ठरेल.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माकडे वनडे संघाच्या कर्णधार पदासह कसोटी संघाच उपकर्णधारपद दिले होते. मात्र, मुंबईमध्ये सरावादरम्यान त्याला दुखापत झाली. स्नायू दुखापतीमुळे (hamstring injury ) त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. वनडेपूर्वी फिट होण्यासाठी तो सध्या रिहॅबिलिटेशन (rehabilitation) साठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. रविंद्र जाडेजाही याच ठिकाणी आहे. आशिया कप स्पर्धेला जाण्यापूर्वी युवा भारतीय संघाचा कर्णधार यश धूलची या दोन दिग्गजांसोबत मोलाचा वेळ घालवता आला.

रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. रोहितच्या जागी भारतीय अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाल (Priyank Panchal ) याला टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणे तसे मुश्किलच आहे. द्रविडमुळे त्याला आंतरराष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडले. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला. वनडेची कॅप्टन्सी देखील रोहितकडे देण्यात आली. त्यामुळे मर्यादीत षटकात रोहित तर कसोटीसाठी विराट कोहली अशी कर्णधारपदाची विभागणी करण्यात आली आहे. या घटनांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT