Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : इतिहास रचला... मालिका बरोबरीत सोडवली तरी रोहित एका गोष्टीवर नाराज

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma : भारताने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्याच दिवशी 7 विकेट्स राखून पराभव केला. भारताने मालिका 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. भारताने आफ्रिकेचा पहिला डाव 55 तर दुसरा डाव 176 धावात संपवला. तर भारताने पहिल्या डावात 153 तर दुसऱ्या डावात 3 बाद 80 धावा केल्या होत्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने केप टाऊनवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर प्रतिक्रिया दिली. त्याने सामन्यातील एक गोष्ट आवडली नसल्याचं सांगितलं. रोहित म्हणाला, 'आम्ही सेंचुरियनवर झालेल्या कसोटी सामन्यातून बरच काही शिकलो. आम्ही आमच्या चुका सुधारल्या. आम्ही, विशेषकरून आमच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले.'

'आम्ही रणनिती आखली होती त्याप्रमाणे संघातील खेळाडूंनी कामगिरी केली. आम्ही चांगली फलंदाजी केली आणि जवळपास 100 धावांची आघाडी घेतली. मात्र आम्ही शेवटच्या सहा विकेट्स ज्या प्रकारे गमावल्या ते नक्कीच सुखावणारं नव्हतं. आम्हाला माहिती होतं की हा सामना फार कमी दिवसात संपणार आहे.'

'आम्हाला माहिती होतं की प्रत्येक धाव महत्वाची आहे. आम्हाला पहिल्या डावात जी आघाडी मिळाली ती खूप महत्वाची होती.'

रोहित शर्माने मोहम्मद सिराजचे तोंडभरून कौतुक केलं. तो म्हणाला, 'सिराजची कामगिरी आमच्यासाठी खूप खास होती. अशी कामगिरी कायम होत नाही. आम्ही गोष्टी साध्या सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला. बाकी सगळं खेळपट्टीनं केलं.

भारताच्या विजयाचं श्रेय हे मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांना जातं.'

'ज्या ज्यावेळी तुम्ही दक्षिण आफ्रिकेत येता तेव्हा परिस्थिती आव्हानात्मकच असते. आम्ही भारताबाहेर खूपवेळा चांगलं क्रिकेट खेळलं आहे. आम्हाला त्याचा अभिमान देखील आहे. आम्हाला इथं मालिका जिंकायला आवडलं असतं. दक्षिण आफ्रिका हा चांगला संघ आहे. ते कायम आमच्यासमोर मोठं आव्हान उभं करतात.'

भारताने यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिका बरोबरीत सोडवली. तर तीन वनडे सामन्यांची मालिका जिंकली होती. आता कसोटी मालिका देखील बरोबरीत सोडवत दौरा यशस्वी केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT