Rohit Sharma and Rinku Singh News Marathi sakal
क्रीडा

IND vs AFG 3rd T20I : शेवटच्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकून उडवल्या चिंधड्या! रोहित अन् रिंकुने जनतला दाखवले अस्मान

Rohit Sharma and Rinku Singh News :

Kiran Mahanavar

India vs Afghanistan T20 Series : तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 212 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंगचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला.

फलंदाजी करताना रोहित शर्माने शतक तर रिंकू सिंगने अर्धशतक झळकावले. डावाच्या शेवटच्या षटकात रोहित आणि रिंकूने मिळून 36 धावा केल्या. एकेकाळी भारतीय संघाने अवघ्या 24 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकू सिंगने डावाची धुरा सांभाळली.

अंतिम षटकात 36 धावा काढून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघांनी युवराज सिंग आणि किरॉन पोलार्ड यांच्या विक्रमाची बरोबरी केली ज्यांनी इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध एका षटकात 36 धावा केल्या होत्या.

भारतीय संघ फलंदाजी करत असताना करीम जनतने अफगाणिस्तानच्या डावातील शेवटचे षटक टाकले. करीमने या षटकात 36 धावा दिल्या. करीमच्या या षटकात रोहित आणि रिंकूने 5 षटकार आणि 1 चौकार लगावला. या षटकात करीमने नो बॉलही टाकला. या नो बॉलवर त्याला षटकारही लागला. यानंतर करीमने फ्री हिटवरही षटकार ठोकला. करीमच्या या षटकात रोहित शर्माने 2 षटकार आणि रिंकू सिंगने 3 षटकार ठोकले.

या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 24 धावांवर टीम इंडियाला 4 मोठे धक्के बसले, तेव्हा रोहितचा निर्णय चुकीचा वाटत होता, पण क्रीजवर उपस्थित असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी शानदार फलंदाजी करून निर्णय योग्य दाखवला. या दोन फलंदाजांमध्ये 5व्या विकेटसाठी 188 धावांची नाबाद भागीदारी झाली. रोहितने 121 धावांची नाबाद खेळी तर रिंकू सिंगने 69 धावांची नाबाद खेळी खेळली. त्यामुळे टीम इंडियाला 212 धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT