Rohit Sharma Injury
Rohit Sharma Injury 
क्रीडा

Rohit Sharma Injury : भारताला मोठा धक्का! हिटमॅन रोहित मैदानातून थेट रुग्णालयात

Kiran Mahanavar

Rohit Sharma Injured : भारत-बांगलादेश वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षणादरम्यान, हिटमॅन स्लिपवर उभा होता, तेव्हा एक चेंडू त्याच्या डाव्या हाताला जोरात लागला. या घटनेनंतर रोहित वेदनेने रडताना कॅमेऱ्यात कैद झाला. रोहितच्या हातातूनही रक्त येत होते त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. रोहितला एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, 'टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झाली आहे, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे आणि सध्या त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे.' रोहितच्या जागी उपकर्णधार केएल राहुल सध्या मैदानावर संघाचे नेतृत्व करत आहे.

या घटनेत एकीकडे रोहित शर्मा जखमी झाला, तर दुसरीकडे ब्लू आर्मीला एक विकेट मिळू शकली असती जी मिळाली नाही. सिराजच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. रोहितने हा झेल नीट घेतला असता तर भारताचे दुहेरी नुकसान टाळता आले असते. मात्र, या घटनेनंतर लगेचच सिराजने अनामूलला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahanand Dairy : महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा; पाच वर्षांचा करार अन्...

इटली-स्पेनच्या सहलीसाठी 15 दिवसांची रजा मंजूर केल्याबद्दल जनतेचे आभार.. मुश्रीफांची पोस्ट व्हायरल

Cold War: आंतरराष्ट्रीय बाजारात नवं 'कोल्ड वॉर'; चीन झपाट्याने करतंय सोन्याची खरेदी, भारतावर काय होणार परिणाम?

Haryana Political Crisis: राजकीय भूकंप! निवडणुकीआधीच भाजप सरकार कोसळणार? माजी उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ काँग्रेसचं राज्यपालांना पत्र

Online Shopping Scam : ऑनलाईन मागवला एक लाखांचा नवा लॅपटॉप; पण पार्सल उघडताच बसला धक्का.. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT