Rohit Sharma reveal Will be a Next Captain of Indian Cricket Team esakal
क्रीडा

कॅप्टन रोहित म्हणतो माझ्या जागेवर आहे तिघांची दावेदारी!

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आपली पहिली कसोटी मालिका श्रीलंकेविरूद्ध खेळवणार आहे. मात्र निवडसमितीने रोहितची कसोटी कर्णधार (Test Captain) म्हणून निवड करतानाच तो त्याच्या तालमीत टीम इंडियाचा (Indian Cricket Team) पुढचा कर्णधार तयार करेल असे सांगितले होते. याबाबत रोहित शर्माला पत्रकार परिषदेत बोलताना विचारले असता त्याने संघातील तीन खेळाडू आपली जागा घेण्याजोगे आहेत असे सांगितले. (Rohit Sharma reveal Will be a Next Captain of Indian Cricket Team)

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'संघातील केएल राहुल (KL Rahul), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व (Future Leadership) म्हणून पाहिले जाते. मला त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज लागणार नाही. कारण ते तेवढे परिपक्व झाले आहेत. त्यांना ज्यावेळी कोणताची तरी गरज असेल त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यास मला आनंदच होईल. अशा प्रकारेच आमची बढती झाली आहे. आम्हाला प्रत्येकाला कोणी ना कोणी मार्गदर्शन केले आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक जण यातून गेला आहे.'

तो पुढे म्हणाला, 'तुम्ही बुमराह, राहुल आणि ऋषभ पंतबाबत बोलत असाल तर त्यांनी भारतीय क्रिकेटच्या यशात मोठी भुमिका आहे. त्यांच्याकडे भविष्यातील नेतृत्वाच्या (Next Captain) दृष्टीकोणातूनही पाहिले जाते. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर याचे दबाव टाकत नाही. ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी फक्त खेळाचा आनंद घ्यावा आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT